बॅच सुरू : 10 मे 2025 | ऑनलाइन, घरबसल्या
योजनेचा उद्देश:
अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी, युवक, युवती यांना UPSC , MPSC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) इ. , केंद्र शासन, राज्य शासन व इतर विविध विभागांच्या अधिकाराच्या पदावर पदस्थापना मिळण्यास व त्यांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देणे.
योजनेचा लक्षगट:
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी, युवक, युवती जे UPSC , MPSC , बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) इ. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत.
लाभार्थी निवड निकष:
१ . अर्जदार अमृतच्या लक्षित गटातील असावा.
२ . अर्जदार पदवी परीक्षा उत्तीर्ण असतील. (किमान पदवीचे शिक्षण चालू असणे अपेक्षित).
३ . अर्जदार महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
४ . या कालावधीत उमेदवाराने या योजने सारख्या अन्य कोणताही लाभ घेतलेला नसावा.
५ . उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु, ८ लाख पेक्षा कमी असावे, त्यासाठी संबंधित प्राधिकृत अधिकारी यांचा उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.
६ . उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष जास्तीत जास्त ३८ वर्ष असणे आवश्यक.
७ . सदर प्रशिक्षण कार्यक्रम कालावधीत उमेदवाराने स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.
अर्ज करण्याची पध्दत –
योजनेच्या लाभासाठी इच्छुक अर्जदारांनी विहित मुदतीत अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर http://www.mahaamrut.org.in ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासोबत आवश्यक कागदपत्र / दस्तऐवज अपलोड करावेत. तसेच, अर्जाची हार्डकॉपी स्वाक्षरीत करून त्यासोबत आवश्यक सर्व दस्तऐवज / कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून अमृत कार्यालयास विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
लाभाचे स्वरूप:
अमृत – विविध स्पर्धा परीक्षा पायाभूत प्रशिक्षणामध्ये लाभार्थ्यांना
१. विविध स्पर्धा परीक्षा यांचा पायाभूत अभ्यास.
२. दर दिवशी २ तासाचे विषयवार ऑनलाइन लेक्चर. विषयवार तासीकांचे वेळापत्रक आठवडभर प्रशिक्षणार्थी यांना कळविले जाईल.
३. आठवड्याच्या शेवटी शिकविलेल्या अभ्यासक्रमवार आधारित MOCK Test.
४. आभ्यासक्रमाच्या नोट्स, पिपीटी प्रेझेंटेशन ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल.
५. निव्वळ स्पर्धा परीक्षांसाठी तयारी न करता , देशातील समस्या, भूगोल, राजकारण , समाजकारण , आंतरराष्ट्रीय समस्या यांची जाणीव असेला कार्यरकता अधिकारी घडविणे आहे
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
अमृत – विविध स्पर्धा परीक्षा पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम FAQs
१. अमृत – विविध स्पर्धा परीक्षा पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा पदवीधर असणे अथवा पदवीचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
२. असेच प्रशिक्षण इतर संस्थांमध्ये घेतल्यास अमृतकडून लाभ मिळेल का?
नाही.
३ . लाभार्थींना प्रशिक्षणा दरम्यान आर्थिक सहाय्य केले जाईल का?
या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद नाही. परंतु MPSC अथवा UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अमृत संस्थेच्या अर्थ सहाय्य योजने अंतर्गत लाभ घेत येईल.
४ . प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम कोठे मिळेल?
प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम अमृतच्या https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर मिळेल.
५. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वयोमर्यादा काय आहे?
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्ष व जास्तीत जास्त ३८ वर्ष असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा Click here
👉अर्जदारांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा : Click here
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा : 📍 महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, पाचवा मजला, औंध, पुणे – 411067
📞 कॉल करा : 097301 51450
✉️ ई-मेल : info@mahaamrut.org.in
🚀 आजच नाव नोंदवा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा स्वप्नांची उंच भरारी घ्या!